breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

उत्कृष्ट संसदपटू-भाषण पुरस्काराने १२ आमदारांचा सन्मान

मुंबई |

विधान मंडळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने विधिमंडळाच्या कामकाजात प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबदल महाराष्ट्र  विधिमंडळातील १२ सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्यावतीने (कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन- महाराष्ट्र ब्रँच) विधान परिषदेचे सहा आणि विधानसभेचे सहा अशा एकूण १२ सदस्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

विधान परिषद सदस्यांना पुरस्कारांतर्गत सन २०१५-१६ साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार अ‍ॅड. अनिल परब, २०१६-१७ साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार विजय ऊर्फ भाई गिरकर यांना तर २०१७-१८ साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार संजय दत्त यांना, २०१५-१६ साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार अ‍ॅड. राहुल नार्वेकर, २०१६-१७ साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार कपिल पाटील यांना तर २०१७-१८ साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रवीण दरेकर यांना प्रदान करण्यात आला.

विधानसभा सदस्यांना पुरस्कारांतर्गत सन २०१५-१६ साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार डॉ. अनिल बोंडे, २०१६-१७ साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुभाष साबणे यांना तर २०१७-१८ साठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार राहुल कुल यांना प्रदान करण्यात आला. २०१५-१६ साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रा. श्रीमती वर्षां गायकवाड, २०१६-१७ साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार राजेश टोपे यांना तर २०१७-१८ साठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार धैर्यशील पाटील यांना प्रदान करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button