breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

घरगुती गॅस व इंधन दरवाढीविरुद्ध राष्ट्रवादीची निदर्शने

जालना |

इंधन आणि घरगुती वापराच्या गॅसच्या दरवाढीविरुद्ध जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी येथील गांधी चौकात निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून मागील सात वर्षांत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापराच्या गॅसची दरवाढ सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.

त्याचप्रमाणे इंधन आणि गॅस दरवाढीबद्दल केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. निदर्शनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. माजी आमदार अरविंद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाकुळणीकर, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या निदर्शनात सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button