TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

“मला देव भेटला ‘आमचा भाई, अशोक सराफ’, अनेक कलाकार भेटले ,खूप अनुभवलं, त्यावर “चौथा अंक” पुस्तक लिहितोय ः रंगकर्मी हरीष करदेकर

मुंबईः
सेटिंग, प्रॉपर्टी, कपडे पट, पार्श्वसंगीत रेकॉर्ड ऑपरेटिंग आणि सोबत छोट्या छोट्या भूमिका अशी कामे १९६९ ते ९० पर्यंत केली. सुरुंग, वादळ, डॉक्टर लागू ,  झपाटलेली, डार्लिंग डार्लिंग, बोल राधा बोल, हमिदाबाईची कोठी, मवाली अश्वमेघ, अजून यौवनात मी, आकाश पेलताना,  दुभंग आदि नाटकांचे जवळपास साडेपाचहजाराहून अधिक प्रयोग केले, असे प्रतिपादन नाट्यकलावंत हरीष रामचंद्र करदेकर यांनी केले. करदेकर यांचा सन्मान नटश्रेष्ठ अशोक सराफ व डॉ. संजय पैठणकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

हरीष करदेकर यांचे मनोगत  सूत्रसंचालक अभिनेते अतुल परचुरे यांनी वाचून दाखवले. “माझा देव मला भेटला १९७४ ला, त्याने आमचं लग्न लावून दिलं, असा अशोक सराफ आमचा भाई! त्यांनी व मी कामाची सुरवात १९६९ पासून केली, मला माझ्या कामानिमित्त अनेक माणसं भेटली खूप अनुभवलं, त्यावर “चौथा अंक” हे पुस्तक लिहितोय, ही माझी मानवंदना!”

कृतज्ञ मी… कृतार्थ मी या कार्यक्रमात नटश्रेष्ठ अशोक सराफ यांच्यावतीने नाट्य  क्षेत्रातील विष्णू जाधव, सुरेंद्र दातार, बाबा पार्सेकर, सीताराम कुंभार, प्रकाश बुद्धिसागर, वसंत इंगळे, दिप्ती भोगले, उपेद्रा दाते, नंदलाल रेळे आदी २० रंगमंच कलाकार, तंत्रज्ञ, रंगमंचामागील कलाकारांच्या सन्मानाचे आयोजन दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात करण्यात आले होते!

मागील वर्षी ४ जून रोजी नटश्रेष्ठ अशोक सराफ यांनी वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त त्यांच्या अभिनय कारकिर्दीचे कथन ‘मी बहुरूपी’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध झाले. त्यासाठी लाभलेले प्रायोजकत्व निधीचा विनियोग रंगमंच तंत्रज्ञ, कलावंत अशा वयोवृद्ध कलाकारांचा त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता सन्मान करण्यासाठी करावा, अशी इच्छा अशोक आणि निवेदित सराफ यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन अशोक सराफ, निवेदिता सराफ व सुभाष सराफ यांच्यावतीने ग्रंथालीच्या सहकार्याने करण्यात आले होते.

याप्रसंगी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, अल्कोन इंटरप्राईजेसचे अनिल खवटे, दुबईचे प्रख्यात डॉक्टर संजय पैठणकर आणि अशोक सराफ यांचे हस्ते रंगकर्मीचा सन्मान करण्यात आला! निवेदिता सराफ,सुभाष सराफ, ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल, विश्वस्त सुदेश हिंगलासपुरकर यांचे प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी मराठी नाट्यपरंपरेचे मूळ असलेल्या संगीत नाटकांबद्दल कृतज्ञता म्हणून नाट्यपदे मानसी फडके-केळकर व श्रीरंग भावे यांनी सादर केली.

संगिताची साथ साई बँकर, निरंजन लेले यांनी केली. संहिता अरुण जोशी यांची होती. तर अतुल परचुरे व डॉ. मृण्मयी भजक कार्यक्रमाचे रेखीव सूत्रसंचालन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button