Uncategorized

1 जानेवारीपासून ज्येष्ठांचे पास बंद, दिले जाणार ‘स्मार्ट कार्ड’

पुणे |महाईन्यूज| राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून माफक दरात प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना पासऐवजी आता महामंडळाकडून आधार क्रमांकाशी जोडलेले अत्याधुनिक ‘स्मार्ट कार्ड ’ दिले जात आहे. जून 2019 पासून ही सेवा सुरू असून स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करण्याची मुदत 31 डिसेंबर 2019 अखेर आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड असेल अशाच ज्येष्ठ नागरिकांना 1 जानेवारी 2020 नंतर एसटीतून प्रवास करताना तिकिटात सवलत मिळणार आहे. स्मार्ट कार्डसाठी आधार नोंदणी न केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मात्र प्रवास करताना पूर्ण तिकीट दर द्यावा लागणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी आधार नोंदणी केली नाही, तर त्यांना एसटीच्या तिकिटामध्ये दिली जाणारी सवलत बंद होणार आहे. जिल्ह्यातील 12 आगारांमध्ये आतापर्यंत 1 लाख 1500 ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून 50 हजारांहून अधिक ज्येष्ठांना ‘स्मार्ट कार्ड’ पोहचली आहेत. कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, कुरूंदवाड, मलकापूर, चंदगड, राधानगरी, कागल, आजरा, गगनबावडा, मलकापूर येथील आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू आहे.

दरम्यान स्मार्ट कार्डसाठी आधार नोंदणी न केल्यास ज्येष्ठ नागरिकांना 1 जानेवारी 2020 पासून एसटीतून प्रवास करताना तिकीट दर पूर्ण द्यावा लागणार आहे. त्यांना जुन्या पासवर तिकीट दराची सवलत मिळणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button