breaking-newsमनोरंजन

हॉलिवूडच्या क्रिस्टन स्टीवर्टने मोडला रेड कार्पेटचा नियम

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी बॉलिवूडबरोबर हॉलिवूडचेही कलाकार येत आहेत. त्यांच्या वेशभुषा आणि स्टाईलची चमक टिपायला हजारो मिडीयाप्रतिनिधींनीही कानमध्ये गर्दी केली आहे. तिथल्या रेडकार्पेटवरचा वॉक ही या सर्व कलाकारांना आपल्याकडे लक्ष खेचून घेण्याची एक पर्वणी असते. या रेड कार्पेटचा मान मिळावा म्हणून जो तो धडपडत असतो.

हॉलिवूडची ऍक्‍ट्रेस क्रिस्टन स्टीवर्टही त्यापैकी एक आहे. तिने रेड कार्पेटवर येताना शिमर ड्रेस घातला होता. त्याबरोबर ब्लॅक हिल सॅन्डलही घातले होते. तिने रेड कार्पेटवर फोटोग्राफर्सना काही पोज दिल्या आणि नंतर चक्क सॅन्डल उतरवून चक्क अनवाणी चालत ती निघून गेली. खरे तर तिने कानच्या “नो फ्लॅट पॉलिसी’चा निषेध नोंदवण्यासाठी सॅन्डल उतरवले होते. कानच्या रेड कार्पेटवर कोणीही फ्लॅट फुटवेअर घालून चालायचे नाही, असा तिथला नियम आहे. या नियमाची अनेकांनी खिल्ली उडवली आहे.

क्रिस्टनने एका इंटरव्ह्यूमध्ये या नियमाला विरोध दर्शवला होता. याच नियमाचा निषेध करण्यासाठी तिने हील उतरवले आणि अनवाणी चालली. 69 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युलिया रॉबर्टनेही अनवाणी चालून या नियमाचा निषेध केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button