breaking-newsमनोरंजन

संजय दत्तची मुलगी त्रिशालाचे फोटो व्हायरल

बॉलीवुडमधील अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. हे फोटो त्रिशालाने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात त्रिशाला व्हाइट टु पीस आणि नेट गाऊनमध्ये ब्लोड अंदाजात दिसते. तिने फोटोखाली “I can’t wait for summer’ असे लिहिले आहे.

या बोल्ड फोटोवर संजय दत्तची पहिली पत्नी रिया पिल्लई देखील इम्प्रेस असल्याचे दिसून येते. या फोटोवर कमेंट करत तिने आनंद जाहीर केला आहे. आपल्या बोल्ड लुकमुळे त्रिशाला बॉलीवुडपासून दूर असतानाही इंडस्ट्रीमध्ये तिची चर्चा असते. न्यूयॉर्कमधील कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टिस येथे तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या संजय दत्त-ऋचा शर्माची मुलगी त्रिशाला फॅशन डिझायनिंगमध्ये काम करत आहे.

दरम्यान, बॉलीवुडमधील संजय दत्तच्या मुलीच्या प्रवेशाची सर्वांना प्रतिक्षा आहे. मात्र, संजय दत्तने तिला बॉलीवूडपासून दूर ठेवले आहे. याबाबत त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्रिशाला अभियन क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत आहे. मात्र, माझ्या मुलीने बॉलीवुडमध्ये काम करू नये अशी माझी इच्छा आहे, असे सांगितले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button