breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सई ताम्हणकरने ट्रोलर्सना भरला सज्जड दम, म्हणाली…

मुंबई – मराठीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना सज्जड दम भरला आहे. तिने आज बऱ्याच दिवसानंतर ट्विटरवर पुनरागमन केले. मात्र, आता जर कोणी विनाकारण ट्रोल केलं तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असं सई म्हणाली.

वाचा :-प्रथमेश परबचा ‘ओह माय घोस्ट’ १२ फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये झळकणार

सई ताह्मणकर गेले काही महिने फारशी अॅक्टिव्ह नव्हती. २१ सप्टेंबरनंतर तिने थेट नव्या वर्षी म्हणजे १ जानेवारीला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारं ट्विट केलं आहे. त्यानंतर तिने आज काही वेळापूर्वी ट्विट करत मी पुन्हा एकदा ट्विटरवर अॅक्टिव्ह झाले आहे पण अकारण ट्रोल केलं तर तसंच उत्तर दिलं जाईल असं सईने म्हटलं आहे.

सई ताम्हणकर ही मराठीतली बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने धुरळा या सिनेमात केलेल्या कामाचंही कौतुक झालं. तसंच गर्लफ्रेंड, राक्षस या सिनेमातल्या भूमिकाही गाजल्या. सई ताम्हणकर इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. पण गेल्या काही महिन्यांपासून ती ट्विटरवर फारशी अॅक्टिव्ह नव्हती. आता ती ट्विटरवरही अॅक्टिव्ह झाली आहे. तिने अकारण ट्रोल कराल तर त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असं म्हणत ट्रोलर्सना इशाराच दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button