breaking-newsमनोरंजन

सोनमने ऐकला न्यूमरोलॉजिस्टचा सल्ला

विवाहानंतर लगेचच सोनम कपूरने आपल्या नावामध्ये बदल केला होता. इन्स्टाग्रामवर तिने आपले बदललेले नाव “सोनम कपूर आहुजा’ असे बदलल्याचे जाहीरही करून टाकले होते. मात्र सेलिब्रिटी न्यूमरोलॉजिस्ट संजय जुमानीच्या सल्ल्यानुसार सोनमने आपल्या नावामध्ये पुन्हा एकदा बदल केला आहे. आता तिने आपले नाव “सोनम के आहुजा’ असे लावायला सुरूवात केली आहे.

सोनमच्या पूर्वीच्या नावाला “आहुजा’ जोडल्यामुळे आणखीन 5 अंकही जोडले गेले आहेत. यामुळे तिच्या आयुष्यात “अप्स ऍन्ड डाऊन’ होऊ शकतात. 5 हा बुधाचा आकडा आहे. बुध आयुष्यात स्थिरता आणतो. म्हणूनच संजय जुमानीने सोनमला नाव बदलण्याचा सल्ला दिला. नवीन नावामुळे तिच्या नावात 9 अंक जोडला गेला आहे. हा आकडा मंगळाचा असल्याने याचा सोनमबरोबर तिच्या नवऱ्यालाही फायदा होईल.

नवीन नावामुळे सोनमच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात भाग्याची साथ मिळेल, असा दावाही त्यांनी केला आहे. सोनम आणि आनंद आहुजा दोघांचाही न्यूमरोलॉजीवर विश्‍वास आहे. आनंद आहुजा बास्केटबॉल खेळतो. त्यासाठीही तो न्यूमरोलॉजीचा आधार घेत असतो. बास्केटबॉल खेळताना किती नंबरची जर्सी घालावी यासाठी आनंदने संजय जुमानीचा सल्ला मागितला होता. त्यांनी 24 किंवा 33 नंबरची जर्सी घालण्याचा सल्ला दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button