breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

30 जूनअखेर 181.68 कोटी मिळकतकर महापालिका तिजोरीत जमा

सर्वाधिक मिळकतकर आॅनलाईनमधून 104.90 कोटी जमा  

पिंपरी – महापलिकेने मिळकतकर धारकांना घरबसल्या आॅनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने त्याचा सर्वाधिक लाभ नागरिक घेवू लागले आहे. शहरातील नागरिकांनी सवलत योजनेचा पुरेपुर फायदा घेवून 94 हजार 914 मिळकतधारकांनी आॅनलाईन सुविधेद्वारे तब्बल 104.90 कोटी रकमेचा मिळकतकर भरला आहे. 30 जूनअखेर एकूण  1 लाख 72 लाख 861 मिळकत धारकांनी 181.68 कोटी रुपये भरणा जमा झाला आहे, अशी माहिती प्रभारी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. 

पिंपरी चिंचवड महापालिका करसंकलन विभागाकडून पहिल्या तिमाहित 1  एप्रिल ते 30 जून 2018 अखेर एक लाख 72 हजार 861 मिळकत धारकांनी एकूण 181.68 कोटी मिळकतकराचा भरणा केला आहे. पालिकेमार्फेत थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या संपूर्ण बिलांची रक्कम 30 जून 2018 पर्यंत आगाऊ भरणा-या मिळकतधारकांना सामान्य करात सवलत दिली होती.

यामध्ये माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नी राहत असलेल्या मिळकतीस 50 टक्के, महिलांच्या नावे असलेल्या निवासी घरास 50 टक्के, 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणा-या अंध, अपंग, कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावावर असणा-या मिळकतीस 50 टक्के, ग्रीन बिल्डिंग रेटिंग सिस्टिम राबविणा-या मिळकतीस 5 ते 15 टक्के, स्वतंत्र नोंद असलेल्या निवासी मिळकतीस 10 टक्के, तर बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जमिनी यासाठी 5 टक्के सामान्यकरात सवलत दिली होती. यामध्ये 5,971 महिलांनी 3.60 कोटी, 437 दिव्यांग मिळकत धारकांनी 28 लाख, 1 हजार 753 माजी सैनिकांनी 93 लाख, 11 शौर्यपदक सैनिकांनी 26 हजार निवासी व बिगरनिवासी मिळकत धारकांनी 5% व 10% सवलतीचा लाभ घेऊन 96 कोटीचा भरणा केला आहे.

मिळकत कर हा 1 एप्रिल व 1 ऑक्टोबर रोजी सुरू होणा-या सहामाही हप्त्याने आगाऊ देय असतो. थकबाकीसह पहिल्या सहामाही अखेर मिळकतकराची रक्कम 30 सप्टेंबर 2018 अखेर व दुस-या सहामाहीची रक्कम 31 डिसेंबर 2018 अखेर भरणे आवश्यक आहे. असे आवाहन गावडे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button