breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हुबळीतील भीषण अपघातात 6 ठार

हुबळी – कर्नाटकातील हुबळीजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. मृत प्रवासी मुंबईतील असून ते खासगी बसनं कर्नाटकला जात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (17 नोव्हेंबर) पहाटे हा अपघात झाला. मुंबईहून निघालेली खासगी बस हुबळीजवळील राष्ट्रीय महामार्ग 63 वर असताना त्यांना वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर अपघातात 10 जण गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button