breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिंचवड मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चिंचवड विधानसभा मतदार संघातील असंख्य तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. ताथवडे, वाकड, चिंचवड परिसरातील कार्यकर्त्यांनी मनसेची विचारधारा समाजात रुजविण्याचा संकल्प केला. मनसे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक सचिन चिखले यांच्या हस्ते नविन कार्यकर्त्यांना सदस्यत्वाचे पत्र देऊन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हा कार्यक्रम चिखले यांच्या निगडी, यमुनानगर येथील संपर्क कार्यालयात पार पडला. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत बाळा दानवले, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे, रवी जाधव आदी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अध्यक्ष पदी सिध्देश सोनकवडे, तर रोहण पालांडे, चेतन सुनील लिम्हण यांची प्रभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button