breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे विभागात 26 हजार 509 स्थलांतरित मजुरांची सोय; 97 हजार 767 मजुरांना भोजन : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे  ।महाईन्यूज । प्रतिनिधी

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 143 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 80 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 291 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 26 हजार 509 स्थलांतरित मजूर असून 97 हजार 767 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

           पुणे विभागात 8 मे 2020 रोजी  99.88 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.38 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button