breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाराष्ट्रात भाजपा सरकार कसे स्थापन करू शकते? या गोष्टींवर ठरणार संपूर्ण समीकरण

मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे सरकार अडचणीत आल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या शिंदे काल विधानपरिषदेसाठी झालेल्या मतदानानंतर नॉट रिचेबल झाले आहेत. शिंदेंसोबत २२ आमदार आहेत. या सोबत आणखी ४ आमदारांनी देखील शिंदे यांना पाठिंबा दिलाय. यामुळे सरकारमधील २६ आमदार कमी झाले आहेत. राज्यात सत्ताधाऱ्यांमध्ये इतक्या घडामोडी सुरू असताना भाजप ज्यांच्याकडे विधानसभेत सर्वाधिक जागा आहेत त्यांच्याकडून कोणत्याही हलचाली दिसत नाहीत.

राज्यात याआधी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. अर्थात त्यानंतर शरद पवार यांनी बाजी पटली देखील होती. या घटनेचा अनुभव पाठीशी असलेल्या भाजपने सध्या वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांची गरज आहे. भाजपकडे स्वत:चे १०५ आमदार आहेत, सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना ३९ आमदारांची गरज आहे. हा नंबर त्यांनी मिळवला तरी पक्षांतरबंदी कायद्यामुळे अन्य पक्षातील आमदार त्यांच्या सोबत आले तरी भविष्यात त्यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते.

जोपर्यंत एकनाथ शिंदे किंवा अन्य पक्षातील ३६ आमदार भाजप सोबत येत नाहीत तोपर्यंत भाजपला सरकार स्थापन करता येणार नाही. शिवसेनेकडे ५४ आमदार आहेत, त्याचे ३६ आमदार बाहेर पडले तर भाजप सरकार स्थापन करू शकले. काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत, आता त्याचे १० आमदार नॉट रिचेबल असल्याचे समजते. काँग्रेसचे किमान २९ आमदार बाहेर पडले तरच भाजपला फायदा होईल. या एका गोष्टीमुळेच भाजप सावध पावले टाकत आहे. फक्त आमदारांना एकत्र आणले तर सरकार स्थापन होईल मात्र पक्षांतरबंदी कायद्यामुळे ते टिकणार नाही.

महाराष्ट्र विधानसभा एकूण सदस्य- २८८
भाजप-१०६
शिवसेना- ५५
राष्ट्रवादी- ५२
काँग्रेस- ४४
अन्य आणि अपक्ष- ३०

शिंदे यांच्या बंडखोरी आधी ठाकरे सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा होता. यात शिवसेनेचे ५५, राष्ट्रवादीचे ५२ आणि काँग्रेसचे ४४ आमदार होते. त्या शिवाय समाजवादी पक्षाचे २, पीजपी २ आणि बीवीएचे ३ आणि ९ अपक्ष आमदारांचा समावेश होता. सध्या शिंदे यांच्या सोबत २२ आमदार आहेत. सोबत अन्य ४ जणांचा समावेश आहे. भाजपकडे १०६ आणि पाठिंबा दिलेल्या आमदारांचा मिळून ११३ इतके संख्याबळ आहे.

बहुमतासाठीचे संख्याबळ- १४५ (२ आमदार तुरुंगात आणि एकाचे निधन)

एकनाथ शिंदे यांच्या सोबत किती?- २२ शिवसेनेचे + ४ अपक्ष मिळून एकूण २६

भाजप + शिंदे= १३२

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button