breaking-newsआंतरराष्टीयक्रिडा

हिमा दास आणि मोहम्मद अनसला रौप्यपदक

जकार्ता – भारतीय धावपटू हिमा दास आणि मोहम्मद अनस याहिया या दोघांनी ऍथलेटिक्‍समध्ये 400 मीटर प्रकारात रौप्यपदकांची कमाई केली आहे. हिमाने अंतिम फेरीत 50.79 सेकंदात 400 मीटरचे अंतर पार केले तर मोहम्मदने 45.69 सेकंदात 400 मीटरचे अंतर कापून रौप्यपदकाला गवसणी घातली. दोघांनाही सुवर्णपदकाने थोडक्‍यात हुलकावणी दिली. या दोन रौप्यपदकांमुळे भारताचे आठव्या दिवसात चौथे रौप्यपदक ठरले आहे. त्यांच्या या कमगिरीने भारताच्या धावपटूंनी आशियाई स्पर्धेत आपली मोहोर उमटवली आहे.

तर भारताच्या गोविंदन लक्ष्मणननला 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदकाची कमाई केली होती मात्र त्याचे ते कांस्य पदक काढुन घेण्यात आले.दरम्यान, भारताच्या लक्ष्मणं गोविंदमने 29.44.91 वेळेत शर्यत पूर्ण केल्याने त्याला कांस्य पदक मिळाले होते मात्र त्याने चुकुन आपल्या ट्रॅकच्या बाहेर पाय ठेवल्याने त्याचे हे कांस्य पदक काढुन घेण्यात आले.

नुकत्याच झालेल्या जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या 18 वर्षीय हिमाची ही पहिलीच आशियाई स्पर्धा होती आणि त्यात तिने रौप्यपदक जिंकले. याच गटात भारताच्या निर्मलाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. हिमाने या कामगिरीसह राष्ट्रीय विक्रमही नोंदवला. त्यापुर्वी, 20 वर्षांखालील गटाच्या जागतिक स्पर्धेत आसामच्या हिमाने 51.46 सेकंदाची वेळ नोंदवून 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक नावावर केले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती आणि विशेश म्हणजे ट्रॅक प्रकारातील भारताचे ते पहिलेच सुवर्णपदक ठरले होते.

हिमाने गेल्या दोन दिवसात दोन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करत स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली असून पहिल्यांदा तिने उपान्त्यफेरीत 51.00 सेकंदात स्पर्धा पुर्णकरत राष्ट्रीय विक्तमासह अंतीम फेरी गाठली होती तर अंतीम फेरीत तिने 50.59 सेकंदात आजची स्पर्धा पुर्णकरत दुसऱ्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे. मात्र बहरिनच्या सल्वा नासेरहिने ही स्पर्धा केवळ 50.09 सेकंदात पुर्णकरत विक्रमी सुवर्णपदक पटकावले आहे. तर भारताची दुसरी महिला खेळाडू निर्मला शेरॉनने स्पर्धा 52.96 सेकंदात पुर्ण केल्याने तिची पदकाची संधी थोडक्‍यात हुकली.

तर पुरुषांच्या गटातील स्पर्धेत अनसने 400 मिटरचे अंतर 45.69 सेकंदात पुर्णकरत रौप्य पदकाची कमाई केली. यावेळी कतारच्या हसन अब्देल्लहयाने पटकावताना स्पर्धा केवळ 44.89 सेकंदातच पुर्ण करताना रेकॉर्ड कायम केले. तर भारताच्या द्युती चंदने 100 मिटरच्या अंतिम फेरीत धडक मारली असून तिने हे अंतर केवळ 11.43 सेकंदात पुर्ण करत तिसरे स्थान पटकावले. यावेळी ओल्गा साफ्रोनोव्हा आणि हजर अल्खादी यांनी केवळ 11.42 सेकंदात स्पर्धा पुर्ण करताना पहिले आणि दुसरे स्थान पटकावले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button