breaking-newsराष्ट्रिय

सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड

नवी दिल्ली – न्यायसंस्था आणि सरन्यायाधीश यांच्याविरुद्ध केलेल्या दोन ट्विटप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना दोषी ठरविले. खुशाल शिक्षा द्या, पण माफी मागणार नाही, या भूमिकेवर ठाम असलेल्या प्रशांत भूषण यांना एक रुपया दंड आकारण्यात आला आहे.

दरम्यान, भूषण यांना आकारण्यात आलेला 1 रुपयाचा दंड त्यांनी 15 सप्टेंबर पर्यंत न भरल्यास त्यांना 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि 3 वर्षे वकिलीची प्रॅक्टीस करण्यास बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे, असेही सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीत स्पष्ट करण्यात आले.

22 जून रोजी सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरच्या रविभवन येथे हेर्ले डेव्हिडसन या बाईकवर स्वार झाल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावर प्रशांत भूषण यांनी ट्विट केले होते. तसेच 2009मध्ये न्यायसंस्थेतील भ्रष्टाचारावर त्यांनी ट्विट केले होते. या दोन प्रकरणात भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठाने भूषण यांना 14 ऑगस्टला दोषी ठरविले. 20 ऑगस्टला शिक्षेबाबत सुनावणी झाली, पण भूषण यांना पुनर्विचार करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी दिला गेला. आपण न्यायालयाचा अवमान केलेला नाही. त्यामुळे माफी मागणार नाही. या भूमिकेवर भूषण ठाम राहिले.

मंगळवारी न्यायालयात सुनावणीवेळी ‘सर्वोच्च’ पेच पहायला मिळाला. न्यायमूर्ती मिश्रा, प्रशांत भूषण यांचे वकील राजीव धवन आणि केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी भूमिका मांडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button