breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

SSR Case: CBI पथक चौकशीसाठी रियाच्या घरी जाण्याची शक्यता, चावीवाल्यापासून सुशांतच्या घरी पोहोचणाऱ्या पोलिसांची चौकशी

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता सीबीआयच्या टीमने चौकशीला सुरुवात केलेली आहे. सीबीआयची टीम आज कुठल्याही वेळी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या घरी तिची आणि तिच्या कुटुंबाची चौकशी करण्यासाठी पोहोचू शकते. सीबीआयच्या टीमने काल (22 ऑगस्ट) सुशांत सिंह राजपूतच्या घरी आणि कूपर रुग्णालयात जाऊन चौकशी केली आहे. कूपर रुग्णालयातच सुशांतचं शवविच्छेदन करण्यात आलेलं होतं. सीबीआयने आतापर्यंत सिद्धर्थ पिठाणी, नारज आणि दीपेश सावंत यांची चौकशी केली आहे.

त्याशिवाय सीबीआय  निरज, सिद्धार्थ आणि दिपेशला समोरासमोर बसवून चौकशी करणार असल्याची माहिती आहे. तसेच, सुशांतच्या घरी सर्वांत आधी पोहोचणाऱ्या पोलिसांची चौकशी होऊ शकतेय. लॉक मिस्ट्री समजून घेण्यासाठी ज्या चावीवाल्याने सुशांतच्या खोलीच्या दरवाज्याची चावी बनवली त्या रफीकची देखील चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तसेच, रिया चक्रवर्तीला समन्स बजावून तिचा जबाब नोंदवला जावू शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button