breaking-newsपिंपरी / चिंचवड

मानसी गांगजी ठरली ‘चॅलेंजर’, दहावीच्या परीक्षेत ९४.८ टक्के मिळवून शाळेत प्रथम

  • पिंपळे सौदागरच्या चॅलेंजर पब्लिक स्कुलचा दहावीचा सीबीएसई बोर्डाचा निकाल शंभर टक्के…!

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल आज (बुधवारी) जाहीर करण्यात आले. तब्बल १८ लाख विद्यार्थ्यी निकालाच्या प्रतीक्षेत होते. cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांनी आज आपला निकाल ऑनलाईन पाहिला.

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कुलचा दहावीचा सीबीएसई बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. चॅलेंजर पब्लिक स्कुलमधील चार विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत; तर २ विद्यार्थी ८९ टक्क्यांपेक्षा अधिक व २ विद्यार्थ्यांना ८१ टक्य्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे व टक्केवारी

मानसी गांगजी ९४.८ टक्के (४७४ मार्क्स), आर्या जरीपटके ९४.६ टक्के (४७३ मार्क्स), कृतिका जाणवेकर ९१.८ टक्के (४५९ मार्क्स), सेजल वासवानी ९१.६ टक्के (४५८ मार्क्स), अदिती कुंभार ८९.६ टक्के (४४८ मार्क्स), सैषा शिंदे ८१.४ टक्के (४०७ मार्क्स), पुनीत पी. ८१.० टक्के (४०५ मार्क्स), दिया मेहता ८०.८ टक्के (४०४ मार्क्स).

शाळेचे संस्थापक संदीप काटे म्हणाले की, महाराष्ट्रातील सीबीएसई संलग्न शाळांच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.०५ आहे. महाराष्ट्र राज्याचा समावेश असलेल्या पुणे केंद्राचा क्रमांक देशात चौथा आहे. पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कुलमधून सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी बसले होते. त्यातील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा शंभर टक्के निकालाची चळवळ शाळेने सुरु केली आहे. ती कायम राहील. शाळेतील विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झालेल्या व इतर सर्वच विद्यार्थ्यांनी यापुढेही शाळेचे नाव उज्वल करावे. शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग यांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी मोठी मेहनत घेतली. त्यामुळेच हे यश शाळेला मिळू शकले. सर्वच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून मी त्यांच्या पुढील शिक्षणाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, वर्गशिक्षिका सीमा सरदेसाई, विषय शिक्षिका दीप्ती बक्षी, अल्पना गंगाळ, अपर्णा सरवटे, रुपाली कुलकर्णी, निकिता मेरानी, रुपाली मोहिते यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button