breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

हिमायतनगर पोलिसांची जुगार अड्यावर धडाकेबाज कार्यवाही ; तिघा विरुद्ध गुन्हा दाखल


हिमायतनगर | शहरातील लकडोबा चौक च्या बाजूस असलेल्या जुगार अड्डयावर हिमायतनगर पोलिस स्टेशनच्या पथकाने दि 18 जुलै रोजी सायंकाळी धडाकेबाज कार्यवाही केलि त्या कार्यवाहित पोलिसांनी 950 रुपयांची नगदी रोकड व तिन अरोपिना अटक करण्यात आले.

या बाबत सविस्तर व्रत असे कीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे त्यात खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन सुद्धा पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी केले होते तरी पण शहरात संचारबंदी असतानाही शहरातील मोकळ्या जागेत काही जण जुगार खेळत असल्याची माहिती कळताच या माहितीच्या आधारे पोलिसांनी येथे छापा टाकला. त्या वेळी येथे तिन जण जुगार खेळत असल्याचे आढळले त्यानुसार लकडोबा चौक परिसरात बदक छाप 52 पत्ते या नावाचा जुगार खेळणाऱ्या आरोपिना हिमायतनगर पोलिसांना सापळा रचुन तेथे जुगार खेळत असलेले आरोपी राजु संभाजी हनवते,देवानंद प्रल्हाद हनवते,राहुल गोविंद कदम राहणार हिमायतनगर यांच्या सह नगदी 950 रूपये व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले त्यांच्या विरुद्ध हिमायतनगर पोलिसात कलम 12 अ मुंबई जुगार कायदा अन्वय CRN नों 149/20 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली बिट जमादार लपशेटवार हे करीत आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button