breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

10 राज्यांत बर्ड फ्लूबाबत चिंता, मुंबईत BMC कडून 1916 हेल्पलाईनची व्यवस्था

देशात आता बर्ड फ्लूचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. आता 10 राज्यांमध्ये पसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एवियन इन्फ्लुएंजा अर्थात बर्ड फ्लूचा फैलाव दिल्ली आणि महाराष्ट्रातही झाल्याची बाब स्पष्ट करण्यात आली. दरम्यान, अद्यापही मानवामध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याची कोणतीही घटना समोर न आल्यामुळं अंडी आणि चिकन खाण्यावर, विक्रीवर शासनाकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध आणण्यात आलेले नाहीत.

आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याच्या माहितीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात परभणी, मुंबई, दापोली अशा विविध भागांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळत आहे.

मुंबईत मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्यांच्या चाचणी अहवालातून बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानंतर सतर्क होत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. यामध्ये पक्षी कुठंही मृतावस्थेत आढळल्यास नागरिकांनी 1916 या क्रमांकावर संपर्क साधत याबाबतची माहिती देण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button