breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणास प्रारंभ

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्वेक्षण केंद्र शासनामार्फत ४ ते ३१ जानेवारीपर्यंत होणार आहे. पिंपरी चिंचवड शहर या स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी झाले असुन ४ जानेवारी पासुन स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत आहे.

पहिल्या स्वच्छ सर्वेक्षणात देशात नववा क्रमांक, त्यानंतर दुसऱ्या सर्वेक्षणात सत्तरावा क्रमांक आणि गेल्यावर्षीच्या सर्वेक्षणात ४६ वा क्रमांक मिळाला होता. यंदाच्या सर्वेक्षणात चांगले गुण मिळावेत, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छ अभियानाची पूर्वतयारी केली आहे. गृहनिर्माण सोसायटी, हॉटेल, रुग्णालय, शाळा महाविदयालयातील विदयार्थी, सेवाभावी संस्था, बचतगट, स्वयंसेवी संस्था, नागरिक, मनपाचे सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करुन घेतले आहे.  चिंचवड शहरास या सर्वेक्षणात चांगला गुणानु क्रमांक मिळावा, असा निर्धार महापौर राहूल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला आहे. मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, शहरांचा गुणानुक्रम निश्चित करण्यासाठी संकलित केलेली माहितीचे  मुल्यांकनासाठी पाच हजार गुणांची प्रश्नावली आहे. त्याचे विभाजन ४ भागात केलेले आहे. यास प्रत्येकी १२५० याप्रमाणे गुण आहेत.  महानगरपालिकेकडुन प्राप्त झालेली ऑनलाईन माहिती, कचरा मुक्त शहरांसाठी प्रमाणपत्रे (स्टार रेटींग) आणि ओपन डेफिकेशन फ्री सिटीज ( ओडीएफ), प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे प्राप्त झालेली माहिती आणि नागरिकांच्या प्रतिसादाद्वारे अभिप्रायान्वये प्राप्त झालेली माहितीलाही गुण मिळणार आहे. याबाबतची सर्व तयारी महापालिकेने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button