breaking-newsमनोरंजन

तामिळ रॉकर्सकडून आता ‘गली बॉय’ही लीक

रणवीर आलियाची प्रमुख भूमिका असलेला ‘गली बॉय’ या चित्रपटालाही पायरसीचा फटका बसला आहे. पायरसीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या तामिळ रॉकर्सकडून हा चित्रपट लीक झाला आहे. गेल्यावर्षभरात रणवीरच्या ‘पद्मावत’, ‘सिम्बा’ आणि आता ‘गली बॉय’ला पायरसीचा फटका बसला आहे.

व्हॅलेंटाइन डे म्हणजे १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीरसोबतच आलिया भट्टही प्रमुख भूमिकेत आहे. मात्र ‘गली बॉय’ प्रदर्शित होऊन एक दिवस उलटत नाही तोच चित्रपट तामिळ रॉकर्सकडून लीक करण्यात आला आहे. तामिळ रॉकर्स या बेवसाइटच्या अनेक मायक्रोसाइट्स ब्लॉक करण्यात आल्या होत्या, मात्र तरीही चित्रपटाची पायरसी रोखण्यात अपयश येत आहे.

‘तामिळ रॉकर्स’कडून होणाऱ्या पायरसीमुळे निर्मार्त्यांना याचा मोठा फटका बसत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले सर्वाधिक चित्रपट ‘तामिळ रॉकर्स’कडून लीक होत आहे. आता या वेबसाइटवरून बॉलिवूड चित्रपटही लीक होऊ लागले आहे. गेल्या महिन्याभरात ‘ठाकरे’, ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांशी’, ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’सारखे चित्रपट या वेबसाइट वरून लीक करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button