breaking-newsमुंबई

कांदिवली स्टेशनजवळ रेल्वेची ट्रकला धडक

मुंबई : रेल्वे रुळावर ट्रक आल्याने जोराची धडक होऊन अपघात झाला. कांदिवली स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली. ट्रकची मागील बाजू रेल्वे मार्गावर आल्याने ही धडक झाली. सुदैवाने या अपघातत कुणालाही दुखापत झाली नाही.

पश्चिम रेल्वेमार्गावरील कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे लाईनचं काम सुरु आहे. यासाठी ट्रकमधून आवश्यक मालवाहतूक केली जाते. मात्र आज दुपारी साडेबाराच्या सुमारास, आलेल्या रेल्वेने, या ट्रकला धडक दिली. या धडकेमुळे ट्रकच्या मागील बाजूचं नुकसान झालं आहे. शिवाय रेल्वेच्या धडकेमुळे ट्रक फरफटत गेल्याने दुभाजकाच्या बॅरिकेट्स तोडून, ट्रक पुढे गेला.

सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातामुळे घटनास्थळी पोलीस आणि अधिकाऱ्यांनी धाव घेत, आवश्यक उपाययोजना केल्या.

दरम्यान, रेल्वे लाईनचं काम सुरु असताना, रेल्वेमार्गावर ट्रक कसा आला, यामध्ये कोणाचा हलगर्जीपणा आहे का, याबाबत आता तपास सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button