breaking-newsTOP NewsUncategorizedराष्ट्रिय

‘हिंदू देशभक्तच केवळ… – सचिन सावंत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशभक्त आणि हिंदू याबद्दल एका कार्यक्रमात वक्तव्य केले होते. हिंदू असेल तर तो देशभक्त असायलाच हवा. देशभक्त असणे हे हिंदूंच्या नसानसात भिनलेले असते. हिंदू भारतद्रोही असूच शकत नाही, असे भागवत म्हणाले होते. ‘मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रियॉट- बॅकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज’ नावाच्या इंग्रजी पुस्तकाच्या विमोचन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले होते.

यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका करण्याची संधी सोडली नाही. काँग्रेसनेही यावर टीका केली आहे. ‘हिंदू देशभक्तच आहेत, केवळ संघाचे किंवा संघाशी संबंधित सोडून’, असा टोला काँग्रेस नेते सचिन सांवत यांनी मोहन भागवत आणि संघाला लगावला आहे.

मोहन भागवतांच्या या वक्तव्यानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी गाधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेबाबत काय विचार आहे?, असा सवाल भागवतांना केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button