breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादी भाजपाला देणार धक्का; काळे अजित पवारांच्या उपस्थितीत करणार प्रवेश

पंढरपूर |

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगू लागला असून, मतदानापूर्वीच भाजपाला मोठा धक्का बसणार आहे. भाजपाचे नेते कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चत झाल्याचं वृत्त आहे. काळे ८ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून, राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे. मात्र, मतदान होण्यापूर्वीच भाजपाला धक्का बसणार आहे. भाजपाचे नेते कल्याणराव काळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

कल्याणराव काळे हे ८ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. पंढरपूर मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न सुरू असतानाच काळे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश भाजपाला धक्का मानला जात आहे. २०१४ मध्ये कल्याणराव काळे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांना ६५ हजार मतं मिळाली होती. त्यानंतर लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काळे यांनी भाजपात प्रवेश केला होता.

  • मागील काही दिवसांपासून सुरू होती चर्चा…

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा आधापासूनच कल्याणराव काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. कल्याणराव काळे यांनीही तसे संकेत दिले होते. एका कार्यक्रमात बोलताना ‘आपण यापुढे शरद पवार साहेब सांगतील त्या पद्धतीने काम करू,’ असं विधान केलं होतं. ‘पवार यांच्यामुळेच साखर कारखान्याचे धुरांडे पेटले. आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार,’ असं ते म्हणाले होते.

वाचा- टोला लगावल्यानंतरही आनंद महिंद्रांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार; म्हणाले…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button