breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कला क्षेत्रात प्रगतीसाठी वेळेचे भान गरजेचे – एअर मार्शल (नि) भुषण गोखले

पिंपरी | प्रतिनिधी

कुठल्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल, तर वेळ पाळणे खुप गरजेचे आहे. विशेषतः सिने क्षेत्रात वेळेचे महत्त्व खुप आहे. यश पाहिजे असेल तर वेळेचे भान असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन एअर मार्शल (नि) भुषण गोखले यांनी केले.

कृष्णवलय 24 मोशन पिक्चर आणि आपुलकी महिला बाल विकास संस्था निर्मित ‘दो कटिंग चाय’ या लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

प्रसिद्ध लेखक ग्रीन वर्ल्ड चे अध्यक्ष गौतम कोतवाल याप्रसंगी बोलताना म्हणाले की, दो कटिंग चाय या लघुपटामध्ये समाजातील आर्थिक विषमतेवर प्रकाश टाकला गेला आहे. व्यक्तीला त्याकडे असणार्‍या पैशावरून न तोलता त्याच्यातील गुणांवर त्याची तुलना व्हावी हा मोठा सामाजिक संदेश या लघुपटातून दिला गेला आहे. या फिल्मचे निर्माता, दिग्दर्शक व लेखक बाबु नाईक यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमासाठी फिल्ममधील कलाकार विद्या वारीसे, योगिनी गायकवाड, सई निगडे, सिनेकलाकार वैष्णवी जाधव, अभिषेक बोर्‍हाडे हे उपस्थित होते. लघुपटाचे सहदिग्दर्शक अंकित बेंडगे, डिओपी जयेंद्र घोलप, स्थिर चित्रण काळे सर तर  फिल्मसाठी विशेष सहाय्य ललितशेट जैन, सुरेश जैन, शैलेश बडदे, रविंद्र चव्हाण, गौतम कोतवाल, रामभाऊ दहाड यांनी केलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button