breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने होम क्वारंटाईन

कोल्हापूर – जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघांचे खासदार धैर्यशील माने यांच्या सासऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर माने यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. सासऱ्यांच्या संपर्कात आल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचे खा. माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले.

खा. माने यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्या सासऱ्यांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांचा स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल आला असून ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. माझा त्यांच्याशी संपर्क आल्याने खबरदारी म्हणून मी माझ्या कुटुंबियांसोबत पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन होत आहे. मी व माझे सहकारी नागरिकांच्या सेवेसाठी फोनवरून उपलब्ध आहोत, असा संदेश त्यांनी होम क्वारंटाईन होताना दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button