breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

काँग्रेसचा विरोध असतानाही बहुसदस्यीय प्रभाग, राज्य सरकारच्या निर्णयावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई |

जनतेचं म्हणणं मांडणं हेच आमचं काम असल्याचं सांगत आपण राज्य सरकारकडे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी आपण राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नागपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसचा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध असून आपण द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीचा विचार करण्यासंदर्भात राज्य सरकारला सुचवलं असल्याचंही पटोले यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचा विरोध असताना राज्य सरकारने असा निर्णय़ का घेतला याविषयी त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले, तीन पक्षांचं सरकार आहे. अनेकांची अनेक मतं होऊ शकतात. पण जनतेचं म्हणणं मांडणं आमचं काम आहे. आम्ही, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनाही भूमिका कळवली होती. सरकारकडे झालेला असेल निर्णय पण पुढच्या कॅबिनेटच्या वेळी त्याचा पुनर्विचार व्हावा ही विनंती आम्ही केलेली आहे. महापालिका निवडणुकीतील बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून एकसदस्यीय वॉर्डप्रमाणे निवडणूक घेण्याच्या शासनाच्या यापूर्वीच्या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्याची काँग्रेसची अपेक्षा बळावली होती. परंतु, राज्य शासनाच्या बुधवारच्या बैठकीत पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग (तीन सदस्य प्रभाग) पद्धतीने निवडणूक घेण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळेच मागील पंधरा वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपसाठी हा निर्णय पथ्यावर पडणारा ठरेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

महापालिकेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी एक वर्षांपासून सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी सुरू के ली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पंधरा वर्षांपासून महापालिके त सत्तेत असलेल्या भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने कंबर कसली होती. या प्रयत्नातूनच बहुसदस्यीय प्रभाग रद्द करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली होती. कारण या पद्धतीचा फायदा भाजपला होत असल्याचे यापूर्वीच्या तीन निवडणुकांच्या निकालातून दिसून आले होते. त्यामुळे ही पद्धत बाद करीत एक सदस्यीय वॉर्ड प्रणालीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. २५ ऑगस्टला राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला वार्ड फेररचनेचा आराखडाही तयार करण्यास सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसचा उत्साह वाढलेला होता. एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो, असा अंदाज राजकीय पंडित वर्तवत होते. मात्र बुधवारी २२ सप्टेंबरला मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन पुन्हा बहुसदस्यीय म्हणजे तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसचा हिरमोड झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button