breaking-newsक्रिडा

हरभजन सिंगने आयपीएलमधून घेतली माघार;चेन्नई सुपरकिंग्सला आणखी एक धक्का

मुंबई – आयपीएलचा तेरावा हंगाम सुरू होण्याआधीच चेन्नई सुपकिंग्सजला एकावर एक धक्के बसत आहेत. आधी १२ स्टाफ कोरोना पॉझिटीव्ह निघाले. त्यानंतर स्टार फलंदाज सुरेश रैना याने माघार घेतली. आता चेन्नई संघातील अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंगनेही बॅंक आऊट करण्याचा निर्णय घेतला आहे.

वैयक्तिक कारणास्तव हरभजन सिंगने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020 मधून माघार घेतली आहे. त्याने शुक्रवारी आपला निर्णय चेन्नई सुपरकिंग्जला कळवला. यंदाच्या आयपीएलमधून वैयक्तिक कारण दाखवत आपले नाव मागे घेणारा सुरेश रैनानंतर तो सीएसकेचा दुसरा खेळाडू ठरला. टीमबरोबर यूएईला प्रवास करुन रैना मायदेशी परतला होता, तर हरभजन भारतातच आहे.

दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड वगळता ‘चेन्नई सुपरकिंग्ज’ संघातील सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. दोघे बाधित खेळाडू 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी देतील. कोरोना संसर्गामुळे सीएसके संघाचे प्रशिक्षण उशिरा सुरु झाले.

तीन वेळा चॅम्पियन्स ठरलेले ‘चेन्नई सुपरकिंग्ज’ 21 ऑगस्ट रोजी आयपीएलमधील गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसह यूएईमध्ये दाखल झाले होते. एमएस धोनीकडे नेतृत्व असलेल्या सीएसकेने यूएईला जाण्यापूर्वी चेन्नईत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.

सीएसकेचा कणा असलेला रैना वैयक्तिक कारण सांगून आधीच भारतात परतला आहे. मात्र नुकतेच एका मुलाखतीत त्याने आयपीएल 2020 मध्ये चाहते कदाचित आपल्याला पाहतील, असे म्हणत पुनरागमनाचे संकेत दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button