breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीतील बार, पब आणि क्लब ९ सप्टेंबरपासून सुरू होणार

नवी दिल्ली – जवळपास ६ महिन्यांपासून कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बार बंद आहेत. त्यामुळे तळीरामांच्या घशाला कोरड पडली आहे. परंतु आता दिल्लीतील तळीरामांसाठी खुशखबर आली आहे. दिल्लीतील बार, पब आणि क्लब ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. याबाबतच्या दिल्ली सरकारच्या प्रस्तावाला उपराज्यपाल अनिल बैजन यांनी मंजुरी दिली आहे. मात्र त्यासाठी घालून दिलेल्या नियमांची त्यांना काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.

दिल्लीतील बार, पब, क्लब आणि हॉटेलसाठी काही नियम सरकारने तयार केले आहेत. त्यानुसार बार किंवा पबच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच बसण्याची परवानगी आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ते केवळ ट्रायल बेसिसवर चालतील. ज्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसतील त्यांनाच स्टाफमध्ये काम करण्याची परवानगी असेल, थर्मल स्क्रिनिंगनंतरच ग्राहकांना बार किंवा पबमध्ये प्रवेश दिला जाईल. कंटेन्मेंट झोनमधील बार, पब आणि क्लबवरील बंदी कायम आहे. प्रवेशद्वारावर आणि इतर ठिकाणी सॅनिटायझर बंधनकारक केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button