breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

‘दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो, पण…’, मराठा आरक्षणावरून संभाजी भोसले पुन्हा आक्रमक

पुणे – मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी भाजप खासदार संभाजी भोसले पुन्हा एकदा आक्रमक झाले असून आता पुढचे मूक आंदोलन नांदेडमध्ये होणार असल्याची ग्वाही त्यांनी आजच्या पुण्यातील बैठकीत दिली. मराठा क्रांती मोर्चातर्फे आज पुण्यात बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी त्यांनी पुढील भूमिका स्पष्ट केली. तसंच, दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायचं नाही, असंही संभाजी भोसले म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी आतापर्यंत सांमज्यसाची भूमिका घेतली. अनेकजण मतभेद विसरून एकत्र आले. त्यामुळे दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो, पण आपल्याला ते करायचं नाही, असं सांगत आपल्याला मराठा आरक्षणाची लढाई संयमानेच लढावी लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. वर्षानुवर्षे जे लोक एकमेकांची तोंडं पाहत नव्हते ते आज या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. आपल्याला अशाच एकजुटीने लढायचं आहे आणि मराठा समाजाला न्याया मिळून द्यायाचा आहे, असं संभाजीराजेंनी या बैठकीमध्ये सांगितलं.

मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापलेलं असतानाच १४ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधला होता. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या अजित पवारांनी सोमवारी कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे जाऊन शाहू महाराजांची भेट घेत चर्चा केली. अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात जवळपास एक तास बैठक सुरु होती. याच बैठकीनंतर ज्या चर्चा झाल्या त्यावरुन संभाजीराजेंनी टीकाकारांना आज मराठा मोर्चाच्या बैठकीमधील भाषणातून सुनावलं. ज्या दिवशी महाराज मॅनेज होतील त्यादिवशी घरी बसेन, असं संभाजी भोसले आजच्या बैठकीत म्हणाले.

पुढे संभाजी भोसले म्हणाले की, आरक्षणाचा मुद्दा पुढील अनेक दिवस चालेल पण आपल्या मागण्याचं काय? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांसोबत २२ मागण्यांसाठी बैठक झाली,मात्र अजून यात काहीच केलं नाही,आता सरकारने वसतिगृह बाबत जीआर काढून दाखवावा,आता दोन महिने झालेत, असंही संभाजीराजे म्हणाले.

नांदेडमध्ये मूक मोर्चा…

आता काय करायचं? तुम्ही सांगा काय करायचं? दोन मूक आंदोलनं झाली तरी राजे शांत. महापूर आला म्हणून आम्ही थांबलो. दोन महिने झाले कोव्हिड परस्थिती सुधारते. पण तुम्ही मराठा समाजाचे एवढे आंदोलन झालं. त्यासाठी अजून एक आंदोलन करावे लागणार. आता नांदेडला एक मूक आंदोलन करू, असंही संभाजीराजे म्हणालेत. २० ऑगस्ट रोजी नांदेड येथे मूक आंदोलन होणार होणार असल्याची घोषणा या कार्यक्रमामध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वयकांनी केलीय.

आझाद मैदानावर उपोषणाची तयारी…

तसेच मी सुद्धा आता तेच तेच बोलून थकलोय अशा शब्दात त्यांनी आपली या मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन होत असलेल्या विलंबाबद्दलची नाराजी व्यक्त केलीय. मात्र त्याचवेळेस त्यांनी मराठा आरक्षणासाठी आता थेट मुंबईतील आझार मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषण करण्याची घोषणा संभाजीराजेंनी केलीय.”माझी एकट्याची आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषणास करण्याची माझी तयारी आहे. तुम्हीच ठरवा आणि सांगा,” असं संभाजीराजेंनी या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ बाबत काहीच नाही केलं मग हे किती दिवस झालं असं चालणार, ओबीसींना शिक्षणात दिल्या जाणाऱ्या सवलती तरी जाहीर काही तरी करा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button