breaking-newsताज्या घडामोडीपुणे

स्वाभिमानी शेतकरी संघटना मुख्यमंत्र्यांना दाखवणार काळे झेंडे

सांगली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कवठेमहांकाळ (जि सांगली) येथे  रविवार (२३ डिसेंबर) रोजी विविध भूमिपूजन कार्यक्रम व मेळाव्यासाठी येत आहेत. उसाला एकरकमी एफआरपी मिळावी, तासगाव तालुक्यातील सावळजसह चार गावांचा टेंभू योजनेत समावेश व्हावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस रविवारी कवठेमहांकाळ तालुक्यात येत आहेत. त्यांचे नागज व् सांगली जिल्ह्यात अन्य ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा त्यांच्या मार्गावर गनिमी काव्याने त्यांना काळे झेंडे दाखवणार आहोत. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. साखर कारखाने सुरू होऊन दीड ते दोन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना पहिला हप्ता आलेला नाही. एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला जात आहे. राज्य शासनाने ऊस उत्पादकांना थेट मदत करण्याची गरज आहे. एकरकमी एफआरपीसाठी राज्य सरकारने राज्य शासनाने पँकेज द्यावे. मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही दोन तुकड्यात एफआरपी घेणार नाही, असे खराडे यांनी सांगितले.

ऊसदर आंदोलनाच्या तोडग्यावेळी सर्व कारखानदारांची आमच्यासोबत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी पहिला हप्ता उशिरा देऊ.पण एकरकमी देऊ, असे कबूल केले होते. त्यामुळे कारखानदारांनी शासनाकडून मदत घ्यावी. पण दोन तुकड्यात पहिला हप्ता देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

तासगाव तालुक्यातील सावळज,वडगाव, लोकरेवाडी,डोंगरसोनी तर कवठेमंहाकाळ तालुक्यातील आगळगाव,जाखापूर, शेळकेवाडी, कुची,ही गावे दुष्काळग्रस्त आहेत. तासगाव तालुक्यातील सावळज, डोंगरसोनी, वडगाव, लोकरेवाडी या चार गावांचा टेंभू योजनेत समावेश करावा, अशी आमची व् शेतकऱ्यांची मागणी आहे. अपूर्ण योजना तशाच ठेवून नव्या योजनांची उदघाटने केली जात आहेत. त्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचे खराडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button