breaking-newsताज्या घडामोडी

स्वातंंत्र्यदिना निमित्त विठ्ठल-रखुमाई मंंदिराच्या गाभार्‍याची अनोख्या पद्धतीची सजावट

भारताचा 74 वा स्वातंंत्र्य दिन आज कोरोनाच्या संकटात नेहमी प्रमाणे नसला तरी त्याच मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. याच निमित्तानं पंंढरपुर येथे असणार्‍या विठ्ठल-रखुमाई मंंदिरही अनोख्या पद्धतीची सजवण्यात आलं आहे. स्वातंंत्र्यदिना निमित्त भारताचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंंग्याच्या रंंगाच्या फुलांंची आरास विठ्ठल-रखुमाई मंंदिराच्या गाभार्‍यात करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, ही सजावट पुण्यातील मोरया समूहाच्या वतीनं करण्यात आली आहे.

सध्या सोशल मीडियावर या सजावटीचे सुंंदर फोटो पाहायला मिळत आहेत. पंंढरपुरच्या विठ्ठल-रखुमाई मंंदिराच्या गाभार्‍यात सर्व सणांंच्या निमित्ताने अशाच प्रकारची फुलांची आरास करण्यात येते, यानिमित्ताने हे मंंदिर नेहमीच चर्चेत असते.

या फुलसजावटीत आपण पाहु शकता की, रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाची पैठणी नेसवण्यात आली असून गळ्यात तिरंगी उपरणं घालण्यात आलं आहे. तसेच विठ्ठ्ल मुर्तीला सुद्धा गळ्यात तिरंंगी उपर्णे घालून सजवण्यात आला आहे, हा अनोखा साज श्रुंगार भाविकांंच्या पसंतीस उतरत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button