breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा – कोरोनाच्या सावटाखालीही देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनाच्या दिवसालाच गालबोट लागले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका दाम्पत्याने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.

सातारा जिल्ह्यातील एका खासगी बँकेतील अधिकाऱ्यांनी तब्बल 41 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या नलावडे दाम्पत्यांनी केला आहे. या दाम्पत्याने वेळोवेळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रारही नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या दाम्पत्याची तक्रार दाखल करून घेतली नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊनही त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर या दाम्पत्याने आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दोघांनी आपापल्या अंगावर पेट्रोलचे कॅन ओतले. मात्र समोरील पोलिसांनी प्रसंगावधान राखत या दाम्पत्याच्या हातातील कॅन हिसकावून घेतले. जीवितहानी टळली असली तरी या घटनेने सातारा शहरात एकच खळबळ माजली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button