breaking-newsराष्ट्रिय

तोयबाच्या दहा दहशतवाद्यांविरोधात एनआयएचे आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली – पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दहा सदस्यांविरोधात आज येथील न्यायालयात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आरोपपत्र दाखल केले. पाकिस्तानस्थित म्होरक्‍यांच्या सूचनेवरून भारतात संघटनेच्या कारवाया वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

एनआयएने आरोप ठेवलेल्यांपैकी पाच जणांना याआधीच अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित पाच जण फरार आहेत. शेख अब्दुल नईम, बेदर बख्त, तौसिफ अहमद मलिक, दिनेश गर्ग आणि आदीशकुमार जैन यांचा अटक झालेल्यांत समावेश आहे. तर हबिब-उर-रहमान, गुल नवाज, जावेद, मोहम्मद इम्रान आणि अमजद हे फरार आहेत.

अमजद हा पाकिस्तानी नागरिक आहे. तोयबाच्या कारवायांना पुनरूज्जीवन देण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी नोव्हेंबर 2017 मध्ये एनआयएकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button