breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वच्छ भारत अभियानात यंदा पिंपरी-चिंचवड पिछाडीवर; सर्वेक्षणात मिळाले 43 वे स्थान

पिंपरी – केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण यादीमध्ये पिंपरी-चिंचवड 2016 मध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर होते. मात्र, यंदा स्वच्छतेच्या बाबतीत उद्योगनगरी पिच्छाडीवर पडली आहे. 2017 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण यादीत शहर 72 व्या क्रमांकावर फेकले गेले होते. यंदा मात्र पिंपरी-चिंचवड शहराला 43 वी श्रेणी प्राप्त झाली आहे.

स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये 4 हजार 41 शहरांचा सहभाग होता. स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, नागरिकांना घराबरोबर परिसरातही स्वच्छता ठेवण्यास भाग पाडणे, स्वच्छता अॅपद्वारे जागृती करण्याचे प्रबोधन करणे आदी घटकांना मार्क्स देण्यात येणार होते. चालू वर्षामध्ये 4 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले. पालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. शहरवासियांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत 41 हजार 493 जणांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड केले होते. अॅप डाऊनलोड करण्याच्या स्पर्धेत पालिका 17 व्या क्रमांकावर होती. तसेच, त्याचे 400 गुण देखील मिळाले होते.

स्वच्छ सर्वेक्षणात टॉप-10 मध्ये आलेल्या शहरांचा गौरव करण्यात येतो. 2016 मध्ये स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहर टॉप 10 मध्ये होते. शहराचा 9 वा क्रमांक आला होता. तर, महाराष्ट्रातून 1 नंबर आला होता. पंरतु, 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड शहर पिछाडीवर गेले होते. त्यामुळे यंदा स्वच्छ सर्वेक्षणाच्या यादीत शहराचे काय होणार, असा प्रश्न होता. मात्र, मागील वर्षापेक्षा शहराला यंदा चांगले गुण मिळाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button