breaking-newsताज्या घडामोडीपुणे

संजय मामांनी भाजपशी केलेल्या गद्दारीची किंमत मोजावी लागेल

  • महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा

मुंबई – भाजपच्या पाठिंब्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले संजय शिंदे यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय शिंदे यांच्यावर जोरदार टीका केलीय. संजय मामांना भाजपशी गद्दारी केली आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल असा इशारा पाटील यांनी दिला.

मुळचे राष्ट्रवादीचेच असलेल्या संजय शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करत जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवलं. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते राष्ट्रवादीत परतले आणि माढ्याची उमेदवारीही मिळवली. शिंदे हे मोहिते पाटील घराण्याचे विरोधक असल्याने राष्ट्रवादीने त्यांच मन वळवून त्यांना आपल्या तंबूत ओढलं.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माढ्याचं सर्वच गणित बदलून गेलं होतं. त्यामुळे पवारांनी नवी खेळी करत शिंदेना आपल्याकडे खेचून आणलं. या खेळीने चिडलेल्या चंद्रकांतदादांनी संजय शिंदेंना इशारा दिल्याने माढ्याचं राजकारण आणखी रंगणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button