breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील ‘बाळराजे’ दिवेशनं दहावीच्या परीक्षेत मारली बाजी

पुणे |महाईन्यूज|

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बालपणीची म्हणजेच बाळराजेंची भूमिका साकारणाऱ्या दिवेश मेदगे याच्यावर सध्या अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. निमित्त आहे ते म्हणजे दहावीच्या परीक्षेत त्यानं संपादन केलेलं यश.

मालिकेमध्ये संभाजी राजांची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनीसुद्धा एक खास पोस्ट लिहित दिवेशला शिवमय शुभेच्छा दिल्या. ‘स्वराज्य रक्षक संभाजी मालीकेतील बाळराजे साकारणारे.चि.दिवेश मेदगे याला #sscboard परीक्षेत ९०.६०% मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शिवमय शुभेच्छा.!’, असं त्यांनी लिहिलं.

दिवेशच्या या कामगिरीबद्दल सर्वांना माहिती होताच लगेचच चाहत्यांनीही त्याला शभेच्छा देण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे शुभेच्छा देत असताना कित्येकांनी त्याचा उल्लेख ‘बाळराजे’ असाच केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button