breaking-newsटेक -तंत्रव्यापार

स्मार्टफोन, टीव्ही, वॉशिंग मशीन महागण्याची शक्यता; बजेट नव्हे ‘हे’ आहे कारण!

महाईन्यूज |

कोरोना या जीवघेण्या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. चीनमधून प्रसार झालेल्या या विषाणूचा आता व्यापार जगतावरही परिणाम दिसायला सुरूवात झालीये. किमान भारतातील इलेक्ट्रिक कंपन्यांचं हेच म्हणणं आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमधून भारतात आयात केले जाणारे साहित्य आणि सूटे भाग (कंपोनेंट्स) यांच्यावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे भारतात उत्पादनात कपात आणि नव्या उत्पादनांच्या लाँचिंगमध्ये उशीर होणार असल्याचं स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी म्हटलेल आहे.

सूटे भाग आयात होण्यासाठी जेवढा उशीर होईल तितका अधिक परिणाम इलेक्ट्रॉनिक उद्योगावरही होणार आहे. टेलिव्हिजन तयार करण्यासाठी वापरले जाणारे जवळपास 75 टक्के कंपोनेंट्स आणि स्मार्टफोन कव्हर्सचे 85 टक्के कंपोनेंट्स चीनमधून येतात. यामध्ये मोबाइल डिस्प्ले, ओपन सेल टीव्ही पॅनल, मुद्रित सर्किट बोर्ड, कॅपेसिटर, मेमरी आणि एलईडी चिप्स यांसारखे कंपोनेंट्स चीनमधून आयात केले जातात. याशिवाय एअर कंडीशनर कंप्रेसर्स आणि वॉशिंग मशीनच्या मोटर्सची आयातही चिनी कंपन्यांद्वारे केली जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button