breaking-newsराष्ट्रिय

चौथीच्या मुलांनी CAA विरोधात नाटक सादर केल्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल

महाईन्यूज |

कर्नाटकमधील बिदर येथे एका शाळेने सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) नाटक बसवल्याने पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. शाहीन ग्रुपच्या शाळेकडून हे नाटक बसवण्यात आलं होतं. या नाटकात चौथीच्या मुलांना सहभागी करण्यात आलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी शाळा आणि व्यवस्थापनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

२६ जानेवारी रोजी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते निलेश रक्शल्य यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेलं नाही. दरम्यान शाळकरी मुलं पोलीस ठाण्यात बसले असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरुन संताप व्यक्त होताना दिसत आहे. शाळा व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, चौथीच्या मुलांनी नाटकाच्या माध्यमातून देशात जी सध्या परिस्थिती आहे ती दर्शवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोपही शाळेकडून कऱण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button