breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: धार्मिक मेळाव्यांना बंदी घालण्यास पाकिस्तानातील धर्मगुरूंचा विरोध

सर्वत्र करोना विषाणूचा उद्रेक झाला असताना धार्मिक मेळाव्यांवर बंदी घालण्याच्या विरोधात पाकिस्तानातील ५० हून अधिक ज्येष्ठ धर्मगुरूंच्या एका गटाने सरकारला इशारा दिला आहे. याऐवजी अधिकाऱ्यांनी धार्मिक निकषांचे पालन करावे, आणि अल्लाला क्षमा मागण्यासाठी अधिक उपासकांना मशिदीत जाण्याची मुभा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पाकिस्तानात सुमारे ५ हजार ७१५ लोकांना संसर्गित करणाऱ्या प्राणघातक करोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या उपाययोजनांचा भाग म्हणून, पाचहून अधिक लोकांना प्रार्थनेसाठी एकत्र येण्यावर सरकारने बंदी घातली आहे.

सामाजिक अंतर राखण्याबाबत सरकारने विनंती केल्यानंतरही वफाकुल मदारिस अल अरबियाशी संबंधित असलेल्या रावळपिंडी व इस्लामाबाद येथील सुमारे ५३ ज्येष्ठ धर्मगुरूंनी धार्मिक मेळाव्यावरील बंदीबाबत चर्चा करण्यासाठी येथील जामिया दारूल उलूममध्ये सोमवारी बैठक घेतली, असे वृत्त ‘डॉन न्यूज’ ने दिले.

एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात सुरू होणार असलेल्या रमझानच्या पवित्र महिन्यात करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने योजना आखण्यापूर्वीच हा इशारा देण्यात आला आहे. ‘मशिदी बंद करणे, तसेच शुक्रवारच्या आणि विशेष प्रार्थना थांबवणे हे देशवासियांना मान्य नाही’, असे इस्लामबादेतील जामिया दारूल उलूम झकारियाचे अध्यक्ष पीर अझिझुर रहमान हज़्‍ारवी म्हणाले.

‘नेत्यांनी धार्मिक निकष पाळावेत’ : विविध मदरसे, बंदी घातलेले गट, प्रतिबंधित व्यक्ती, तसेच राजकीय व अराजकीय पक्ष यांचा समावेश असलेल्या या बैठकीत अधिकाऱ्यांना बंदीविरुद्ध इशारा देण्यात आला. सरकारमधील नेत्यांनी धार्मिक निकष पाळावेत आणि अल्लाकडे क्षमायाचना करावी, असे उपस्थितांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button