breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी सभागृहाबाहेर शिवसेना नगरसेवक निलेश बारणे यांचे ठिय्या आंदोलन (व्हिडिआे)

पिंपरी – महापालिका शिक्षण विभागाच्या शालेय साहित्य खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत शिवसेनेचे नगरसेवक निलेश बारणे यांनी स्थायी समिती सभागृहबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. महापालिकेची आज (बुधवारी) स्थायी समितीची बैठक असल्याने बारणे यांनी दरवाजात ठिय्या मांडल्याने सत्ताधारी स्थायी सदस्यांची चांगलीच गोची झाली आहे. याबाबत महापालिकेच्या स्थायी सदस्यांनी नगरसेवक बारणे यांची भेट घेवून त्यांना या प्रकरणाची सखोल चाैकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. 

शिक्षण मंडळातील अनेक निविदा प्रक्रियेत गडबड झाली आहे. शिक्षण मंडळात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. या व्यवहाराची माहिती मी गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षणअधिका-यांकडे मागत आहे. परंतु, मला अद्याप माहिती दिली जात नाही. याबाबत आयुक्तांकडे देखील पाठपुरावा केला होता. मी आंदोलन करणार असल्याचे आयुक्तांना देखील कळविले होते. फाईल देत नसल्याच्या निषेधार्थ मी आंदोलन करत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button