breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तांत्रीक बिघाडामुळे चक्क पंधरा मिनीटे “महापौर” अडकले बंद “लिफ्ट”मध्ये

  • विद्युत विभागाचा गलथान कारभार
  • आयुक्तांचे होतेय दुर्लक्ष

पिंपरी – महापालिकेच्या लिफ्टचे कारनामे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. यापूर्वी तांत्रीक बिघाडामुळे बंद लिफ्टमध्ये कर्मचा-यांना अडकून पडावे लागले आहे. तर, कधी अधिका-यांना सुध्दा मनस्ताप सहन करावा लागला आहे. मात्र, आज ती वेळ चक्क महापौरांवर आल्याने पालिकेत खळबळ उडाली आहे. तब्बल दहा ते पंधरा मिनीटे महापौर लिफ्टमध्ये अडकल्याने सुरक्षा रक्षकांची एकच धांदल उडाली. लिफ्टमनचा नाईलाज झाल्याने त्याला महापौरांचे बोलणे सहन करावे लागले.

अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी महापौर नितीन काळजे आज बुधवारी (दि. 18) सकाळी पालिकेत आले होते. लिफ्टमधून जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली. चक्क दहा ते पंधरा मिनीटे महापौरांना लिफ्टमध्येच अडकून पडावे लागले. त्यामुळे महापौरांचा संताप अनावर झाला. त्यांनी लिफ्टमनवर राग व्यक्त करताच सर्वांचीच धांदल उडाली. सुरक्षारक्षक जिन्यांवरून वरखाली करू लागले. महापौरांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न झाले. मात्र, दब्बल पंधरा मिनीटांनी महापौरांना बाहेर काढण्यात आले.

यापूर्वी उपमहापौरांच्या दालनाचा शिपाई लिफ्टमध्ये अशाच प्रकारे अडकला होता. लिफ्टच्या तांत्रीक बिघाडामुळे त्याला आयुष्याचे अपंगत्व पत्करावे लागले. त्यापूर्वीही एक कर्मचारी लिफ्टमध्ये अशाच प्रकारे अडकला होता. विद्युत विभागाच्या गलथान कारभारामुळे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचा-यांना लिफ्टच्या तांत्रीक बिघाडाचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे विद्युत विभागाचे अधिकारी प्रविण तुपे यांनी गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळेच लिफ्ट वारंवार बंद पडत आहेत, असा संताप कर्मचारी व्यक्त करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button