breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्र

उद्यापासून होणार ‘हे’ मोठे बदल; घरचं आर्थिक बजेट सांभाळण्यासाठी जरूर वाचा!

Rules Change In August 2023 : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलिंडर अर्थात स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात बदल होऊ शकतो. या कंपन्या सर्वसाधारणपणे एक आणि १६ तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. त्याचसोबत सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्येही बदल होऊ शकतो.

अ‍ॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तींसाठी सूचना आहे. अ‍ॅक्सिस बँक आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करणाऱ्यांना १२ ऑगस्ट २०२३ पासून क्रेडिट कार्डवरून खरेदी करताना कमी कॅशबॅक मिळेल. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी आणि त्यानुसारच खरेदी करावी.

हेही वाचा – ‘ज्ञानवापीला मशीद म्हटलं तर वाद होणारच..’; योगी आदित्यनाथ यांचं विधान

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२३ ही आहे. ही योजना ४०० दिवसांची एक खास मुदत ठेव योजना आहे. त्यात गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना ७.१ टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६ टक्के दराने व्याज मिळणार आहे. सध्याच्या कमी व्याजदराच्या काळात ही योजना नक्कीच चांगला परतावा देऊ शकते. शिवाय स्टेट बँकेत असल्याने फसवणुकीचा धोका नाही. त्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि गुंतवणूक करावी.

ऑगस्ट महिन्यात लक्षात घ्यायची सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या महिन्यात बँका एकूण १४ दिवस बंद राहणार आहेत. त्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्याही समाविष्ट आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बँक हॉलिडे असल्याने बँकांची कामं कधी करायची, याचं नियोजन आधीपासूनच करावं लागणार आहे. अन्यथा कामं रखडू शकतात. कारण सुट्ट्या असल्याने त्यानंतरच्या दिवशी बँकांमध्ये गर्दी होऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button