breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

आळंदीतील भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांची कोयत्याने वार करून हत्या

पिंपरी – आळंदी नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची भरदिवसा कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली. ही घटना पुणे-आळंदी रोडवर वडमुखवाडी येथे आज मंगळवारी (दि. 26) दुपारी चारच्या सुमारास घडली.
बालाजी कांबळे (रा. आळंदी) यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तातडीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले होेते.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी कांबळे बांधकाम व्यावसायिक होते. डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक 9 मधून निवडून आले होते. आज दुपारी चारच्या सुमारास भाजप नगरसेवक कांबळे वडमुखवाडी येथे आले होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यात आणि शरीरावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार केले. यामध्ये कांबळे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दिघी पोलीस तपास करीत आहेत. त्यांच्या पाठीमागे आई, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button