breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘तुम्ही एक दिवस संसदेचेही खासगीकरण कराल’- संजय राऊत

मुंबई | महाईन्यूज

तेल कंपन्या, रेल्वे यांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, तुम्ही एक दिवस लष्कर, पोलीस आणि संसदेचेही खासगीकरण कराल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावलेला आहे. शुक्रवारी ते कामगार संघटना कृती समितीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी देशव्यापी संप ८ जानेवारी रोजी पुकारला आहे. कामगारांच्या देशव्यापी संपाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, केंद्र सरकारने चांगले उद्योग विकायला काढलेले आहेत. तेल कंपन्या, बीपीसीएल, सरकारी जमिनी, रेल्वे, विमान कंपन्या विकत आहेत. या उद्योगांमुळे लाखो कामगारांच्या घरची चूल पेटते, पण सर्व सरकारी उद्योग बंद करून चार लोकांच्या हातात देत आहात. उद्या संसदेचे, पोलीस खात्यांचे आणि भारतीय सैन्याचे खासगीकरण कराल, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावलेला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आहे. येथील कामगार संघटनांचा या सरकारला संपूर्ण पाठिंबा आहे. सेनेने कामगारांच्या प्रश्नांवर आपसात संघर्ष केला नाही. त्यामुळे जानेवारीत होणाऱ्या देशव्यापी संपात शिवसेना सहभागी होणार आहे. जेव्हा मुंबई बंद होते, तेव्हा त्याचे देशावर परिणाम होतात, हे कोणीही विसरू नये, असा इशारा राऊत यांनी मोदी सरकारला दिलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button