breaking-newsराष्ट्रिय

मध्य प्रदेश राज्यात आता केवळ रविवारी लॉकडाऊन

भोपाळ – मध्य प्रदेश सरकारने लॉकडाऊनच्या नियमात आता थोडी सूट दिली आहे. राज्यात आता केवळ रविवारी लॉकडाऊन सुरू राहणार आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत केली.

ते म्हणाले, राज्यात याआधी शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यात आता बदल करण्यात आला असून आता केवळ रविवारी लॉकडाऊन असणार आहे. या सोबतच बाजाराचा कालावधीदेखील वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मार्केट आता रात्री ८ च्याऐवजी रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहे.

तसेच रात्रीच्या कर्फ्यूची वेळ बदलण्यात आली असून आता रात्री ८ ऐवजी रात्री १० वाजल्यापासून सकाळी ५ वाजेपर्यंत हा कर्फ्यू सुरू राहील. तर हॉटेल आणि रेस्टॉरंटदेखील रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवली जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button