breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

MPSC परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर, स्पर्धा परीक्षा उमेदवारांना दिलासा

कोरोनामुळे जवळपास सर्वच क्षेत्रातील परिक्षा या रद्द करण्यात आल्या होत्या..त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षाही स्थगित करण्यात आल्या होत्या… मात्र आता या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार आहे.

एमपीएससीकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. करोना विषाणू संसर्गामुळे एमपीएससीने नियोजित परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हणजे युपीएससी परिक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षां कधी होणार असा प्रश्न राज्यभरातील उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येत होता. एमपीएससी स्टुडंट्स राईट्स, एमपीएससी समन्वय समिती यांच्यासह राज्यभरातील उमेदवारांकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता.

कोरोना विषाणू संसर्ग आणि त्यासाठीच्या उपाययोजनांचा फेरआढावा आयोगाकडून घेण्यात येईल. त्यानुसार संकेतस्थळावर माहिती जाहीर करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे…मात्र एमपीएससीकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानं राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button