breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अखेर पुण्यात जोरदार पावसाला सुरवात…

राज्यभरात काही ठिकाणी पावसाच आगमन झालं आहे…पुण्याचं म्हणायला गेलं तर, हवा तसा पाऊस पडला नसल्यानं पुणेकर पावसाच्या प्रतिक्षेतच होते…आणि अखेर त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे… पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाने आज म्हणजे 17 जूनला दमदार हजेरी लावली. शहरातील जवळपास सर्वच भागांना पावसाने चांगलेच झोडपून काढलं. संध्याकाळी ४ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली….

शहरात मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. त्याचबरोबर आकाशात ढगही दाटून आले होते. दुपारच्या सुमारास अधूनमधून पावसाचे थेंब प़डत होते. मात्र, त्यानंतर संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास शहरातील अनेक भागांमध्ये अचानक अंधारुन येऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली.

यावेळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.त्याचबरोबर पावसाची एवढी जोरदार एन्ट्री बघून दिलासाही नक्कीच मिळाला असणार…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button