breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Coronavirus Havoc : 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

करोना व्हायरसचा फैलाव वाढल्याने राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केल्या आहेत. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने यासंदर्भात परिपत्रक काढलं आहे. सोमवारपासून पुढची सूचना मिळेपर्यंत म्हणजे 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहतील, असं या परिपत्रकात म्हटलं आहे.

करोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शासनाच्या, महापालिकेच्या आणि खासगी शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रिकानुसार होतील. यापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिमखाना, चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. या कायद्याचा भंग केल्यास कारवाई होऊ शकते. शाळा, कॉलेज सुट्ट्या जाहीर केल्या असल्या तरी विद्यार्थ्यांनी सुट्ट्या म्हणून घराबाहेर पडू नये, असं आवाहन आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केलं आहे.

पुण्यातील दहाही रुग्णांची प्रकृती स्थिर

राज्यातील करोनाव्हायरस रुग्णांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे. नागपुरात करोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे नागपुरातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4 झाली आहे, नागपुरात धोका वाढला आहे. तर, दुसरीकडे पुण्याहून दिलासादायक बातमी आहे. पुण्यातील दहाही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button