breaking-newsTOP Newsमनोरंजन

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मालिकेतील सदस्याची आत्महत्या; समोर आले हे कारण

मुंबई – ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या लेखकांपैकी एक असलेल्या अभिषेक मकवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाइड नोटही सापडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाइड नोट लिहिली असून त्यात आर्थिक समस्यांचा उल्लेख केलेला आहे.

अभिषेकने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली. सायबर फसवणूक करून त्याला ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप अभिषेकच्या कुटुंबियांनी केला आहे. अभिषेक मकवाना 27 नोव्हेंबर रोजी कांदिवलीतील आपल्या घरी मृतावस्थेत आढळला होता. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूची केस दाखल केली आहे. याप्रकरणी कुटुंबियांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अभिषेकचा भाऊ जेनिसने, त्याच्या ईमेल्समधून फायनेंशियल फ्रॉडची बाब समोर आल्याचा खुलासा केला आहे. तसंच पोलिसांनीही अभिषेकच्या सुसाइड नोटमध्ये आर्थिक फसवणूकीचा उल्लेख आल्याचं म्हटलं आहे. अनेक दिवसांपासून तो त्रास सहन करत होता. सुसाइड नोटमध्ये याबाबत अधिक काहीही सापडलं नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button